Monday, June 27, 2022
Homeवर्धाभव्य-एक दिवसीयकबड्डी सामन्याचे उद्घाटन सोहळा संपन्न

भव्य-एक दिवसीयकबड्डी सामन्याचे उद्घाटन सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी अमोल झाडे समुद्रपुर

समुद्रपुर:
तालुक्यातील गिरड येथील स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रांगणात ७२वा भारतीय गणतंत्र दिवसानिमित्त हनुमान व्यायाम शाळा व सोनामाता जीवा प्रसारक मंडळ संयुक्त विद्यमाने भव्य एक दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.


सुरुवातीला हनुमांजी आणि सोनामाता फोटोचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी प्रशांत ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून ग्रामीण भागातील खेळाविषयी होत असलेली दैनिक अवस्था ग्रामीण खेळाडू करता प्रशासनाला योग्य ती शासकीय मदत करून घ्यावे
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शेख इस्रायल ग्रामपंचायत सदस्य यांनी खेळाडूंना आवाहन केले की गावातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्थैर्य अबाधित राखण्यासाठी तरुणांनी कर्तव्यदक्ष असले तरच ही भारतीय कबड्डी टिकेल आणि राष्ट्रीय एकता आणि एकात्मता अखंड राहील.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत गिरड चे नवनियुक्त सदस्य राजू नौकर कर ,राहुल गाढवे, मंगेश गिरडे , शुभम बावणे, विजया ताई तेलारांधे, सिंधुताई कापसे , वैद्य ताई, लालसिंगजी ठाकूर, प्रशांत लांडे, मंडळाचे सदस्य सामाजिक अंतर पाळून उपस्थित होते. याप्रसंगी
कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन श्री. विष्णुजी ब्राह्मणवाडे सरांनी केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular