Saturday, June 25, 2022
Homeवर्धाब्ल्यू डायमंड कॉनव्हेंट कडून पैशासाठी शाळेचा दाखल्याची अडवणूक

ब्ल्यू डायमंड कॉनव्हेंट कडून पैशासाठी शाळेचा दाखल्याची अडवणूक

पालकांचा गंभीर आरोप

हिंगणघाट : येथील ब्ल्यू डायमंड कॉन्व्हेट येथे नर्सरी ते केजी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम दिल्याशिवाय शाळेच्या दाखल्याची अर्थात लिविंग सर्टिफिकेट कॉन्व्हेंट व्यवस्थापन देत नसल्याची  तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपविभागीय अधिकाऱ्याना एका निवेदनातून केलेला आहे.

या ब्ल्यू डायमंड कॉन्व्हेंट मध्ये शिकत असलेल्या पाल्यांची मागील वर्षी कोरोना मुळे परीक्षा न झाल्याने यंदा पालकांनी आपल्या पाल्यांचे एडमिशन केले नाहीत.अनेकांना आपल्या पाल्याचे दाखला या कॉन्व्हेट मधून काढावयाचे आहेत.परंतु या कॉन्व्हेंटचे मुख्याध्यापक यांनी लिविंग देण्यासाठी प्रत्येक मुलांच्या पालकांना २ हजार५०० ची रोख मागणी करीत आहेत असा गंभीर आरोप निवेदनातून केलेला आहे.मागील एक सव्वा वर्षांपासून सर्व व्यवसाय बंद असल्याने अनेक कुटुंबे ही आर्थिक अडचणीत आलेली आहेत.अशा भीषण स्थितीत मध्यमवर्गीय व्यक्ती एवढी रक्कम देणे शक्य नाही.त्यामुळे वरीष्ठ शासकीय अधिकारी यांनी त्वरित या प्रकरणाची चौकशी करून ही अवैध वसुलीच्या जिझिया करांपासून पालकांची सुटका करावी व पाल्यांचे लिविंग विनामूल्य उपलब्ध करून घ्यावे अशी विनंती विद्यार्थ्यांचे पालक भारत वरघणे,नेपालचंद्र तुराळे, नंदकिशोर पाटील,दत्तात्रय साखरकर,दीपाली बावणे,जयश्री बावणे यांनी उपविभागीय अधिकारी हिंगणघाट,व पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना एका निवेदनातून केलेली आहे.
या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन पालकांची या आर्थिक लुटीपासून सोडवणूक करावी अशी पालकांची मागणी आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular