अल्पशा आजाराने समुद्रपूर येथील युवकाचा मृत्यू.
समुद्रपूर
समुद्रपूर येथील इलेक्ट्रिक व डेकोरेशन चे काम करणारा युवक सुरज अशोक ठाकरे वय २७ यांचे आज सावंगी येथील रुग्णालयात १६ दिवसांची झुंज देत आज अखेरचा निरोप घेतला. त्याचे काही दिवसांनी लग्न ठरले होते मात्र बोहल्यावर चढण्या पूर्वीच त्याची अंतिम यात्रा निघाली
सूरज लग्न 28 एप्रिलला ठरले होते.

पण त्यातच कोरोणाचे लागन झाले असता,त्याला सावंगी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.त्यातच लग्नाची तारीख जवळ येत असताना त्यांचे लग्न समोर घेण्यात आले होते. सुरज ची हा बाल गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष अध्यक्ष होता.त्याच्या कारकीर्दीत बाल गणेश उत्सव मंडळानी शताब्दी महोत्सव या अंतर्गत जिल्ह्य व तालुक्यातील प्रथम पुरस्कार प्राप्त केला होता. सुरज हा सभावाने मनमिळावू व कोणासाठी कधी पण धावणारा असल्यामुळे युवकांमध्ये व गावात हळहळ व्यक्त करीत आहे. सूरज ची तब्बेती मध्ये सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले होते आसीयू मधून त्याला बाहेर सुद्धा काढण्यात आले होते तर कोरोना टेस्ट सुद्धा निगेटिव्ह होती मात्र अचानक रात्री त्याचा मृत्यू चा संदेश च आला आज त्याचा मृतदेह समुद्रपूर ला आणून स्थानिक मोक्षधाम।वर अंतिम संस्कर करण्यात आले