Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाबॅंकेच्या विरोधात बैलगाडीसह प्रहारचे आमरण उपोषण

बॅंकेच्या विरोधात बैलगाडीसह प्रहारचे आमरण उपोषण

हिंगणघाट ;
तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कापूस सीसीआयाला विकला आहे .

यावेळी शेतकऱ्यांनी सीसीआयला आपली रक्कम जमा करण्यासाठी आपल्या बचत खात्याचा नंबर दिला आहे.मात्र बॅंकेने कित्येक शेतकऱ्यांची हि रक्कम कर्ज खात्यात वळती केली आहे.यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या संबधी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गजु कुबडे यांनी बॅकेने शेतकऱ्यांची कर्ज खात्यात वळती केलेली रक्कम परत बचत खात्यात जमा करुन शेतकऱ्यांना परत द्यावी या मागणी साठी तहसील कार्यालयापुढे उपोषण सुरू केले हवं आहे.

या मागणीचे निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे . तरी सुद्धा शेतकऱ्याना पैशै मिळाले नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे गजु कुबडे यांच्या नेतृत्वात आज तहसिल कार्यालया समोर बॅंकेच्या विरोधात बैलगाडीवर आमरण उपोषण केले.
मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होते. यावेळी
जिल्हा अध्यक्ष जयंत तिजारे,जगदीश तेलरांधे तालुका प्रमुख,
प्रमोद मैसकर,विनोद खंडरकर,विष्णु घरद,नत्थुजी दडमल,नीतेश भोमले,सुरज आष्टणकर,शैलेश झाडे,सतीश गलांडे,बबनराव दामने,बालू घाटे,विजू पडोळे,राहुल चौधरी,प्रशांत मरकवाडे,प्रशांत आवारी,अनंता वायसे,रितेश गुडदे,मंगेश चंडणखेडे,मयुर पुसदेकर,नाना नागथाणे,केशव लेडांगे,नीलकमल वैध,सुनील जगताप,दत्ता सातपुते,शांताराम थुटे,सौरभ धोबे,मंगेश चावके,सुरेश कापसे,दिलीप भोयर,हनुमान हुलके,रुपेश भोयर,राकेश भोयर,राज परचाके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular