Monday, June 27, 2022
Homeवर्धाबिबट कालव्यात मृतावस्थेत आढळला

बिबट कालव्यात मृतावस्थेत आढळला

सेलु :-
केळझर नजिकच्या बंद अवस्थेत असणाऱ्या कंपनी मधून सेलडोह कडे जाणाऱ्या कालव्यात बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
सदर घटना ही २४ जानेवारीचे दुपारी साडे बारा वाजताचे सुमारास एका बकरी चालणाऱ्याला दिसल्याने उघडकीस आली.


केळझर नजिक असलेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्लोसिव्ह कंपनीतून सेलडोह कडे जाणाऱ्या कालव्यात बिबट मृतावस्थेत पडून होता.नामदेव चचाणे हा बकर्या घेवून चारण्यासाठी गेला होता. बकर्या चरताना कालव्याच्या दिशेने निघून गेल्या.त्याचे मागे नामदेव ही कालव्या जवळ जाताच पाण्यात बिबट पडून दिसला परंतू हालचाल दिसून येत नसल्याने त्याचा म्रुत्यू झाला आहे. सदर घटनेबाबत त्याने कंपनीचे सुरक्षा रक्षकाला सांगितले. त्यानी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली.वनविभागाचे सेलु राउंड ऑफिसर डी.आर.पाटील,क्षेत्र सहाय्यक केळझर एन.के.पाचपोर,कोल्हे,मानज वन्यजीव रक्षक कौशल मिश्रा, वनरक्षक खेलकर,चोरे,धोंगडे,काटवटे बावणे हे घटनास्थळी पोहोचले.म्रूत्यू झाल्याची खात्री पटताच त्यांनी पंचनामा केला.
पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत वरभे,डॉ.प्रकाश भिसेकर व डॉ संजय खोपडे यांनी बिबटाचे शवविच्छेदन केले. डॉक्टरांनी बिबटाचा मुत्यू एक दिवस आधी झाला असावा असे सांगितले.
यावेळी उपस्थित वनसंरक्षक तेंदू व वन्यजीव अधिकारी ठाकुर यांनी प्राथमिक अंदाज वर्तविताना सांगितले की याचा म्रूत्यू हा उपाशी असल्याने झाला असावा. फिरते पथक च्या वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनोने ने ही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळीच बिबटला अग्नि देण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular