सेलू– जशी जशी नगरपंचायत निवडणूक जवळ येत आहे तस तसी राजकीय पक्ष सक्रिय होताना दिसत आहे सध्या नगरपंचायत निवडणुकीत बिजेपी, जयस्वाल गट, दफ्तरी गट, तसेच साहसिक जन शक्ती संघटना , यांची जवळपास सर्वच प्रभागातील उमदेवार यांची यादी जवळपास तयार झाली आहे. नुकत्याच झालेल्या बहुजन समाज पार्टी च्या बैठकीत नगरपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे.

दि. 08 जानेवारी 2021 रोजी स्थानिक कार्यालयात बैठक पार पडली आणि त्या मध्ये सेलू नागरपंचयात निवडणूक 2021 मध्ये बहुजन समाज पार्टी आपले उमेदवार निवडणूक लढविणार असा निर्णय झाला बहुजन समाज पार्टी जवळपास दहा प्रभागात बहुजन समाज पार्टी चे आपले उमेदवार उभे करणार आहे . यावेळी बहुजन समाज पार्टी चे जिल्हा अध्यक्ष मोहन राईकवार तसेच वर्धा विधानसभा अध्यक्ष ऍड,अभिषेक रामटेके हे प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते, तसेच धनविज,राजकुमार देवरे,आकाश नदेश्वर, राजेशजी चन्ने,कैलास मस्के,दीपक मून,विनोद पाटील,भगत बहुजन समाज पार्टीचे सेलू चे माजी नगरसेवक हिम्मत अली शहा तसेच सेलू शहरअध्यक्ष निखिल नंदेश्वर , बहुजन समाज पार्टीचे सर्व सदस्य उपस्थित होते.