Monday, June 27, 2022
Homeवर्धाबरबडी येथे दिव्यांग ना निधी वाटप

बरबडी येथे दिव्यांग ना निधी वाटप

वर्धा ; बरबडी ग्रामपंचायत अंतर्गत गावातील दिव्यांग व्यक्तींना ग्रामपंचायतच्या बजेटमधील पाच टक्के निधीचे आज वाटप करण्यात आले.

बरबडी येथे ग्रामपंचत अंतर्गत सामान्य फंडातील पाच टक्के निधी 48 हजार 650 रुपये गावातील 35 दिव्यांग व्यक्तींना वाटप आज करण्यात आले .प्रत्येकी दिव्यांग व्यक्तीला तेराशे नव्वद रुपये देण्यात आले.त्यामुळे दिव्यांग व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंदी भाव दिसून आले.

बरबडी ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवीत आहे .गावात निधन झाल्यास ग्रामपंचायत कडून एक हजार रु. सहाय्यता निधी देण्यात येते,खेळाडूंना प्रोत्साहन निधी ,विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण करिता मदत केली जात आहे .यावर्षी नव्यानेच सरपंच शेतकरी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येणार आहे ,त्यासाठी बजेट मध्ये दीड लाख रुपयांची तरतूद केली आहे. गावातील अल्पभूधारक शेतकरी याना प्रति पाच हजार रुपये सानुग्रह निधी पुढील महिन्यापासून वाटप करणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना निधी वाटप कार्यक्रमास सरपंच संगीता शिंदे,उपसरपंच मदनसिंग धमाणे,सदस्य मृणाल फुलझेले,मधुकर केळवतकर ,अभिजित मेहर,आशा लेंडे, प्रज्ञा झांबरे,विद्या गीरडे,वनमाला बरवाल,संध्या भस्मे,विस्तार अधिकारी दासटवार , कर्मचारी निलेश शेंडे,देवराव भानसे,मंगला देशमुख,निलेश वाटगुळे यांची उपस्थिती होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular