वर्धा :
नागपुर येथील सुराबर्डी दिव्य निर्मलधाम आश्रम येथे दिनांक 29 शनिवार 2022 रोजी नुकतीच फस्ट इन्ड्युजुअल आपेन कराटे चॅम्पियनशिप पार पडली असुन त्यात वर्धा येथील कराटे पटुंनी आपले उत्कृष्ट कौश्यल दाखवुन मेडल पटकाविले. या मध्ये 13 खेळाडु समाविष्ट असुन त्यांना खालील प्रमाणे मेडल मिळाली आहे.
आयुषी कुरटकर गोल्ड , रिया भालकर गोल्ड, प्रज्ञा बांगडे गोल्ड, संचय खडसे गोल्ड, अनिकेत वाघमारे गोल्ड , गायत्री अवसरे सिल्वर, गार्गी ताकसांडे सिल्वर, ऋषिकेश ताकसांडे सिल्वर, सताक्षी खडसे सिल्वर, प्रशिक डंभारे सिल्वर, जान्हवी नांदुरकर सिल्वर, अक्षरा बांगडे सिल्वर चैत्रव्ही डाफले सिल्वर, या 15 वर्षाखालील वयोगटातील खेळाडुंनी उत्कृष्ठ कामगिरी करून गोवा येथे होणा-या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये आपले नाव नोंदविले आहे. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय प्रशिक्षक सिंहान शेख दत्तु, सेन्साई चेतन जाधव, सेन्साई महेश धुर्वे, सेन्साई सिद्धार्थ गजभिये, सेन्साई पराग पाटील व महिला प्रशिक्षक रज्जु राजेश जळगांवकर यांना दिले आहे.