गाईला जीवदान दिले प्राणीमित्र अनिल माहुरे यांनी

आर्वी : अनिल माहुरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सार्वजनिक विहिरीत पडलेल्या गाईचे जीव वाचवून प्राणी मित्रांनी दिले जीवदान सोमवारी डॉ. पंकज चोरे यांच्या घरा मागील एका सार्वजनिक विहिरीत गाय पडली होती. दरम्यान गाय विहिरीत पडून जखमी झाल्याची माहिती तेथील काम करणार्या नागरिकांनी गरुड झेप संस्थेचे सचिव अनिल माहुरे यांना माहिती दिली. तसेच माहिती मिळताच प्राणी मित्रांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठी कसरत करून गाईला विहिरी बाहेर काढले घटनास्थळी प्राणी मित्र तुषार साबळे, अनिल माहुरे, मिलिंद मसराम, रवी शिंपीकर, पंकज सेलोट, विशाल मसराम, ऋतिक वडणारे, मनीष ठाकरे, रुपेश गौतम आदींनी गाईला विहिरीतून बाहेर काढण्याकरीता सहकार्य केले.