(बाळा जगताप यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक समाप्त)
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी :-

तीन दिवसाआधी आर्वी मतदार संघातील मुख्य रस्ते आर्वी – वर्धा, आर्वी – तळेगाव, आर्वी – कौडण्यपुर यांच्या बांधकामात होत असलेल्या दिरंगाई विरोधात निद्रिस्त शासन प्रशासनाला जागृत करण्यासाठी आर्वी येथे प्रहार चे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तहसीलदार आर्वी यांनी संबंधित अधिकारी वर्गाला पाचारण करून दोन ते तीन दिवसात बैठक लावून प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने आज तहसील कार्यालय आर्वी येथे बाळा जगताप यांच्या समक्ष तहसीलदार चव्हाण व नागपूर व अमरावतीचे संबंधित अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तेव्हा बाळा जगताप यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की येत्या दोन दिवसांमध्ये तिन्ही महामार्गावरील वाहतुकीला अनुकूल असा तात्पुरता रस्ता तयार करून देण्यात यावा.. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे खड्डे पडलेले आहे त्यामुळे वाहन चालविता चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी मोठे अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता तिन्ही रस्त्याने वाहन चालविणे सोयीस्कर होईल असा रस्ता तयार करून देण्यात यावा सोबत बाकी संपूर्ण काम हे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे असे सांगितले. सोबतच येत्या शुक्रवार पर्यंत जर वाहन चालवू शकेल असा तात्पुरता रस्ता तयार करून न दिल्यास येत्या शुक्रवारी सकाळी १० वाजता नंतर प्रहार आर्वी विधानसभे तर्फे “मुंडी दफन आंदोलन” करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहारचे मतदार संघाचे नेते बाळा जगताप यांनी दिला..
यावेळी बैठकीला बाळा जगताप यांच्यासह तहसीलदार चव्हाण, उपस्थित होते.