कारंजा:-

वर्धा येथील सिव्हिल लाईन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होत असलेल्या पोलीस वेल्फेअरचा पेट्रोल पंप होत असल्याने आज जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये धरणे आंदोलन व निषेध आंदोलन घेण्यात आले. आज कारंजा येथिल तहसील कार्यालयात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने निवेदन सादर केले आहे. पेट्रोल पंप स्थलांतरित करण्यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पेट्रोल पंप स्थलांतर करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी तहसील कार्यालया समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देत ,पेट्रोल पंप हटाव नारे देण्यात आले. यावेळी समाजकल्याण सभापती विजय आगलावे, विजय बनसोड , सुमित बागडे, कैलास गौरखेडे, शिलवंत ठाकरे, यादवराव सोमकुवर, धनेशवर सोमकुवर, प्रकाश नारनवरे, दीपक बागडे, अशोक नागले, अनिल गौरखेडे, धनराज वानखडे, मारोती खपरे ,रामदास राकसे, गेंदराज इंगळे, लक्ष्मण वाकडे, गजानन गिऱ्हाळे, लालाचंद सोनटक्के, प्रफुल झाटे, दादाराव दुपारे, भूषण पाटील , सुभाष इंगळे, मंदा नागले, संगीता पाटील, राजेश दहिवडे, केशव काळबाडे, विकास दुपारे, कमलेश गजभिये ,समीर बागडे उपस्थित होते.