Saturday, June 25, 2022
Homeवर्धापेट्रोल गॅस दरवाढीविरोधात राकाँचा जनआक्रोश मोर्चा

पेट्रोल गॅस दरवाढीविरोधात राकाँचा जनआक्रोश मोर्चा

उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश मोर्चा बुधवारी करण्यात आला. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस च्या किमती मोठी वाढ केली आहे. वाढलेली महागाई व दरवाढीचा यावेळी निषेध करण्यात आला. मोर्चा आर्वी विश्रामगृह येथून निघून उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकला उपविभागीय अधिकारी धार्मिक यांना सरकारच्या दरवाढीबाबत शिष्टमंडळाने निवेदन दिले. या जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाल मरसकोल्हे, संजय देशमुख, शिरीष काळे, ऋषभ निस्ताने, अनंत झाडे, मीना ठाकरे, सुवर्ण राऊत, कल्पना ठाकरे, कल्पना ढोक, योगिता कदम, लता ढोने, अनुराधा चोभे, कल्पना देशमुख, वैशाली धर्माळे, रोहन गवळी, बाल्या राऊत, संजय कांबळे, संतोष होळकर, युवराज शिरसाट, नागेश राऊत, रमेश बिरोले, मदन सिंग चव्हाण, रणदीप मोटघरे, सुमित बिजवे, इत्यादी यांनी केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular