Saturday, June 25, 2022
Homeवर्धापुलगाव येथील सिता घाटाचे सौंदर्यीकरण.

पुलगाव येथील सिता घाटाचे सौंदर्यीकरण.

—नगरपालिकेचा पुढाकार.
देवळी;
पुलगाव येथील वर्धा नदिवरिल प्राचीन असलेल्या सीता घाटाचे सौंदर्यीकरनाचे काम नगर परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आले असून काही दिवसांमधे शहरातील लोकांकरिता एक चांगले पिकनिक स्पॉट म्हणून उपलब्ध होईल. अशी आशा पुलगावच्या नगराध्यक्ष शितल संजय गाथे यांनी व्यक्त केली आहे.

सिता घाट भाविकांचा श्रद्धास्थान असून येथे अधिक मासात स्नान,पुजा अर्चा केली जाते. या ठिकाणी भाविकांची नेहमी गर्दी असते.
या सीता घाटाच्या बाजूने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात शेवाळ व झाड़े वाढलेली होती त्यामुळे तो भाग अस्वच्छ दिसत होता.शहरातील अनेक सामाजिक संस्था,कार्यकर्ते व पत्रकार बंधु यांच्या मागणीची दखल घेऊन सीता घाटा वरील नदी पात्रातील असलेले झाड़े झुड़पे काढून नदी स्वच्छ करण्यासाठी आज नगर परिषदेच्या वतीने पोकलैंड मशीनद्वारे स्वच्छतेला सुरुवात केली.मशीनद्वारे झाड़े झुड़पे काढल्यानंतर सफाई कर्मचार्याद्वारे उर्वरित स्वच्छता करून घेण्यात येईल. व सिता घाट भाविकांसाठी सौंदर्यीकरण करण्यात येईल याचा पुलगावकर यांना पिकनिक स्पॉट म्हणून उपयोग होवून एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून निर्माण करण्यात येईल.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular