Monday, June 27, 2022
Homeवर्धापुणे येथील आशुतोष निकम

पुणे येथील आशुतोष निकम

डॉ. आंबेडकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम.!

कारंजा(घाडगे)
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त आयोजित
ऑनलाईन वकृत्व स्पर्धा २०२१ मध्ये पुणे येथील युवक आशुतोष निकम प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.द्वितीय क्रमांक चैताली धांदे कारंजा,तृतीय क्रमांक आंचल सरोदे कारंजा यांनी पटकावला.प्रोत्साहनपर चवथा क्रमांक प्रज्वल निकाळजे आष्टी,पाचवा क्रमांक अविराज कामडे कारंजा व सहावा क्रमांक गायत्री सरोदे कारंजा यांनी पटकावला.एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्वोत्कृष्ट भारतीय संविधान,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारत. मी प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय – डॉ.आंबेडकर आणि भारतीय अखंडता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर याविषयावर स्पर्धा आयोजित केली होती.स्पर्धा समन्वयक आणि संयोजन समितीचे विश्वभुषण विनोद पाटील यांनी आभासी पध्दतीने निकाल जाहिर केला. विजेत्यांना प्रथम क्रमांकाचे १५००रूपयांचे बक्षिस विश्वभुषण पाटील तर्फे,द्वितीय क्रमांकाचे १०००रूपयांचे बक्षिस प्रा.सुभाष अंधारे तर्फे तर तृतीय क्रमांकाचे ५००रूपयांचे बक्षिस पियुष रेवतकर तर्फे जाहिर करण्यात आले आहे.प्रोत्साहनपर क्रमांकाला स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञानावर आधारीत पुस्तके माजी मुख्याध्यापक विलास वानखडे यांचे तर्फे जाहिर करण्यात आली.सर्व स्पर्धकांना थोर पुरूषांची पीडीएफ रूपात पुस्तके भेट देण्यात येईल. प्रमुख पाहूणे माजी मुख्याध्यापक विलास वानखडे व प्रा.सुभाष अंधारे यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्यावर माहिती दिली.लता टिपले,नम्रता साळवे,सरोजिनी,चैताली धांदे या स्पर्धकांनी मनोगत व्यक्त केले.स्पर्धा यशस्वितेसाठी पियुष रेवतकर,अक्षय बोडखे,सम्यक् सोमकुंवर यांनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular