Tuesday, June 6, 2023
Homeवर्धापालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

अंतोरा प्रतिनिधी:- आष्टी येथे ग्रामीण रुग्णालयाला माजी आमदार त्यांच्या प्रयत्नाने मिळाली हक्काची जीवनदायिनी रुग्णवाहिका त्या रुग्णवाहिकेचे 1 मे ला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.


अनेक दिवसापासून म000ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वतंत्र रुग्णवाहिकेचा प्रश्न प्रलंबित होता रुग्णवाहिका नसल्यामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले त्यामुळे रुग्णवाहिकेचा हा गंभीर प्रश्न माजी आमदार अमर काळे यांनी लक्षात घेऊन रुग्णवाहिके करिता अथक प्रयत्न केले व पालकमंत्री सुनील केदार यांनी माजी आमदार अमर काळे यांच्या विनंतीला मान देत आष्टी येथे सुसज्ज जीवनदायिनी रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयाला स्वतंत्र रुग्णवाहिका देण्यात आली. व तसेच रुग्णवाहिका दिल्याने आष्टी शहरातील जनतेने माजी आमदार अमर काळे यांचे शतशः आभार मानले रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळा करतेवेळी धार्मिक साहेब (उपविभागीय अधिकारी आर्वी), डॉक्टर सचिन तळस (जिल्हा शल्य चिकित्सक), आशिष वानखडे (तहसीलदार), जितेंद्र चांदे (ठाणेदार), वैद्यकीय अधिकारी अर्शिया शेख, स्नेहल कासारे (तालुका वैद्यकीय अधिकारी), त्रिलोकचन कोहळे (जिल्हा परिषद सदस्य), ईश्वर वरकड (पंचायत समिती सदस्य), प्रा. अरुण भाऊ बाजारे (माजी सभापती), मोहन ढोले (माजी सभापती), जितेंद्र शेटे (जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस), राहुल लाड (तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष), राहुल देशमुख (आष्टी शहर अध्यक्ष), मुमताज भाई (तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक काँग्रेस), संजय शिरभाते, रवी गंजीवाले, मनोहर येनुरकर, युवराज राऊत, नरेंद्र मुकदम ,प्रतीक माणिकपुरे ,शोएब खान, सुरज ढोले ,दिनेश सावरकर, बबलू हसन ,दिलीप पोकळे, दिलीप राठी, दिवाकर चाफले, दिगंबर मुकदम, अंकुश ढवळे, प्रतीक चिंचमलापुरे, शरद शेंद्रे आरोग्य सेवक व सर्व कार्यकर्ते या अनुषंगाने सामाजिक अंतर ठेवत उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media
- Advertisment -

Most Popular