- विद्युत विभागाच्या कार्यालया जवळील घटना
समुद्रपुर: तालुक्यातील उमरेड हिंगणघाट मार्गावरील गिरड जवळील विद्युत विभागाच्या कार्यालया समोर समुद्रपुरकडे जात असलेल्या दुचाकीस्वारा समोर अचानक पायदळ जात असलेल्या महिलेला वाचविण्याच्या नांदात दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघात दुचाकीस्वाराचा मुत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली.मुतक व्यक्तीचे नाव वसंता महाजन शेडगाव (चौरस्ता) जखमी महिलेचे नाव ज्योती प्रकाश रासोकर वय ४० वर्ष असे आहे.

प्राप्त माहितीनुसार रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शेडगाव येथिल समुद्रपुर येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंता महाजन हे नांद येथून एम एच ३२ ए.जी.८०७४ आपल्या मुलीच्या घरुन कार्यक्रम आटोपून शेडगाव येथे परत जात असताना गिरड येथिल विद्युत विभागाच्या कार्यालया समोर ज्योती प्रकाश रासोकर या जेवन करुन रसत्यावर फिरत असतात अचानक महिला समोर आल्याने या महिलेला वाचविण्याच्या नांदात दुचाकी अनियंत्रित होऊन महिलेला धडक देत रसत्यावर आदळली या अपघात दुचाकीस्वार वसंता महाजन यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले तर ज्योती प्रकाश रासोकर ह्या हि गंभीर जखमी झाल्या दोन्ही जखमी तातडीने प्राथमिक उपचारासाठी गिरड येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.मात्र वसंता महाजन यांना हालत नाजुक असल्याने त्यांना पुढिल उपचारासाठी समुद्रपुर येथिल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता येथे त्यांना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मुत्य घोषित केले.तर जखमी महिला ज्योती रासोकर यांना पुढील उपचारासाठी हिंगणघाट येथे पाठविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार महैंद्र सुर्यवंशी,पोलिस कर्मचारी पंचम कोटगिलवार प्रशांत ठोंबरे महैंद्र गिरी रवि घाटुरले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास गिरड पोलिस करीत आहे.
समुद्रपूर येथिल शव विच्छेदन गृह बंद असल्याने शव हिंगनघाट येथिल उप जिल्हा रुग्नायात पाठविन्यात आले. आज दूपारी त्यांची अंत्ययात्रा त्यांचा निवास स्थान शेडगांव(चौरस्ता) येथून जूने शेडगांव येथील वना नदी वर अंत्य संस्कार करन्यात आले.वसंतराव याच्या मागे आई , वडिल, तीन मूली,जावई, नाती व आप्त परिवार आहे.