तुळजापूर( वघाळा): सेलू तालुक्यातील तुळजापूर वघाळा येथील खडका- मुकींदपूर रीठी गाव शेतशिवार परीसरातील टाकळी (किटे) चौरस्ता जवळ हा पांदण रस्ता अनेक दिवसापासून नवीन कामाच्या प्रतिक्षेत असून पावसाळ्यात शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तुळजापूर.वघाळा येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन शेती हंगामात मशागत करण्यासाठी खिळ बसत असून बळीराजाला पावसाळ्यात तारेवरची कसरत करत बैल-बंडी शेती साहित्य घेऊन चिखलमय काटेरी पांदन-रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते आहे . मे महिन्यातच सातही काम टाकून शेतकऱ्यांना शेती साहित्य शेतात नेऊन ठेवावे लागते.

सेलू रोड मार्गाचे दोन वर्षा पासून कासवगतीने काम सुरू असून मधातून पाणी जाण्यासाठी रस्ताच सुरळीत नाही परीणामी पांदन रस्ताचे पाणी अडते. मागील हंगामात याच पांदन रस्ताचे पाणी अडल्या मुळे नदी- नाल्याचे स्वरूप येऊन शेतपिके पाण्याखाली आली होती.शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सेलू रस्ते बांधकाम प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कामाची पुर्तता केली होती.दुर्लक्षीत पांदण रस्ता होनार तरी केंव्हा?असा सवाल येथील शेतकरी करीत असून लोकप्रतिनिधी व शासनाने जातीने लक्ष देऊन पांदन रस्त्याचे काम तातडीने करावे असी तुळजापूर. वघाळा. खडका येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.