Tuesday, June 28, 2022
Homeवर्धापद्मश्री खा. डॉ विकास महात्मे यांचे हस्ते हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयात ५० जम्बो...

पद्मश्री खा. डॉ विकास महात्मे यांचे हस्ते हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयात ५० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर चे लोकार्पण

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाला २५,सिंधी रेल्वे ग्रामीण रुग्णालयाल १० तर, समुद्रपुर ला १५,असे एकूण ५० जम्बो ऑक्सीजन सिलेंडर भेट आयु ६४ कोरोना औषधिचे हस्तातंरण

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

पद्मश्री खा डॉ विकास महात्मे यांचे निधि अंतर्गत प्राप्त ५० जम्बो ऑक्सीजन सिलेंडर चा लोकार्पण सोहळा स्थानिक उपज़िल्हा रुग्णालयाल पार पडला. तसेच आयु ६४ या कोरोना औषधिचे सुद्धा हस्तातंरण करण्यात आले.
या व्यतिरिक्त सिंधी रेल्वे ग्रामीण रुग्णालयाकरिता १० तर समुद्रपुर करीता १५ ऑक्सीजन सिलेंडर प्रदान करण्यात आले.
हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालयात आयोजित लोकार्पण सोहळाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री खा.डॉ विकास महात्मे होते.तर प्रमुख आथिति म्हणून आमदार समीर कुणावार,नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,वैद्यकीय अधीक्षक
डॉ.चाचरकर,डॉ.गिरीश चरडे, भाजपा महामंत्री किशोर दिघे,
ज़ि.प.आरोग्य सभापती मृणाल माटे पं.स.समुद्रपुर च्या सभापती सुरेखा टिपले, डॉ.म्हैसेकर यांची व्यासपीठावर उपस्तीति होती. यावेळी बोलताना आ.कुणावार आपण अतिशय संकटाच्या काळातून जात आहे बोलते वेळस सांगितले.दुसऱ्या लाटेत् कोरोना प्रादुर्भावमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.आता तीसरी लाट येण्याची शक्यता वार्तावल्या जात आहे.या पार्श्वभूमिवर हिंगनघाट उपज़िल्हा रुग्णालय सम्पूर्ण वैद्यकीय सोई व सुविधानी परिपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे.येथील डॉक्टरानी व आरोग्य कर्मचाऱ्यानी उत्कृष्ट सेवा प्रदान करीत आजपावेतो ६५० कोरोना रुग्णावर उपचार केले आहे.असे सांगून डॉ.महात्मे यांनी ऑक्सीजन सिलेंडर व औषधी भेट दिल्याबद्दल आ कुणावार यांनी त्यांचे आभार मानले. अध्यकक्षीय भाषणात डॉ.महात्मे म्हणाले की ऑक्सीजन न मिळाल्याच्या कारनामुळे यापुढे कोणत्याही रुग्णाचे प्राण जाता कामा नये.येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून प्रत्येक शासकीय रुग्णालय ऑक्सीजन व्यवस्था,औषधि, वैद्यकीय उपकरणें आदिनी सुसज्य असने गरजेचे असल्याचे सांगितले.तसेच कोरोना रुग्नानी म्यूकोरमायकोसिस ची भीती न बाळगता आवश्यक ती काळजी कशी घ्यावी या बाबत सुद्धा सविस्तार माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ.चाचरकर तर संचालन समुपदेशक डॉअजय लिडवे यांनी केले.उपस्तितांचे आभार डॉ शंकुतला पराजे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉ.डाखोरे,
आकाश पोहाने,संजय डेहने, बिस्मिल्लाखान,गणेश उगे,बालू इंगोले,कैलास टिपले,विनोद विटाळे तसेच उपज़िल्हा रुग्नालयाचे डॉक्टर,आरोग्य कर्मचारी आदिची उपस्तीति होती.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

2 COMMENTS

Most Popular