Tuesday, June 28, 2022
Homeवर्धापञकार संरक्षण समिती व युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने ठाणेदार याना निरोप समारंभ.

पञकार संरक्षण समिती व युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने ठाणेदार याना निरोप समारंभ.

देवळी :
पञकार संरक्षण समिती वर्धा व युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय देवळी येथे
देवळी पोलीस स्टेशनचे बदली झालेले ठाणेदार नितीन लेव्हरकर यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात नव्यानेच रूजू झालेले ठाणेदार तिरुपती राणे यांना शुभेच्छांबद्दल दोन्ही कार्यक्रम घेण्यात आले.


देवळी शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात जे तत्कालीन ठाणेदार लेव्हरकर यांनी उत्कृष्टरीत्या काम केली या कामाचा यावेळी उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सत्कारमूर्ती नितीन लेव्हरकर उपस्थित होते, प्रमुख अतिथी म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रविण धमाणे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष लांडे,नगर सेवक गौतम पोपटकर,पञकार हरिदास ढोक,शेख सत्तार, युवा संघर्ष मोर्चाचे भुषण कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना लेव्हरकर म्हणाले की, देवळीतील नागरिकांकडून जे प्रेम मिळाले ते जीवनात कधीही न विसरणारे आहे. येथे आल्यानंतर जे चांगले करायचे ते करण्याचा प्रयत्न केला नोकरी करतांना कायदेशीर कामे करावी लागतात.त्यातुन कोणाचे मन दुखले जातात ते मनावर न घेता पुढील कामे करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. येथून माझी बढती झाली आहे हा क्षण देवळीतील माझा कधीच न विसरणारा आहे.त्यामुळे देवळीतील ऋणानुबंध हा कायम राहणार असल्याचे सांगितले. पञकार व युवा संघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून जे सहकार्य मिळाले त्याबाबत त्यांनी सर्वाचे आभार मानले.

नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार तिरुपती राणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून लेव्हरकर यांच्या कार्याचा आदर्श पुढे नेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे म्हणाले.
नितीन लेव्हरकर ठाणेदार असतांना देवळीतील प्रशासन व्यवस्थित पणे हाताळले असून ठाणेदार नितीन लेव्हलकर यांनी सर्व लोकांशी राजकीय,सामाजिक व सर्वसामान्य नागरिका सोबत स्नेहाचे संबध ठेवले. कायदेशीर कारवाई करण्यात माञ कुठेही चुकले नाहीत. याबद्दल लेव्हरकर यांचे खूप आभार मानण्यात आले.

यावेळी पञकार हरिदास ढोक, शेख सत्तार, किरण ठाकरे, भुषण कडू डॉ.प्रविण धमाणे यांनी आपले विचार व्यक्त केले. जे सहकार्य केलेत त्या बाबत लेव्हरकर यांचे आभार मानून पञकार संरक्षण समिती , युवा संघर्ष मोर्चा व व्यांयापारी संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ,भेटवस्तू देवून निरोप देण्यात आला.
देवळी पोलीस स्टेशन मधून बदली होऊन ते अमरावती ला जाणार आहे.त्या बाबत त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे संचालन प्रविण काञे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार योगेश काबंळे यांनी केले. गणेश शेंडे यांनी आभार मानले.
यावेळी देवळीतील पञकार मंडळी व युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवळी पोलीस स्टेशन चे हवालदार खिराळे यांच्या झालेल्या निधनाबद्दल दोन मिनिटं उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीगिताने करण्यात आली .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular