Tuesday, June 28, 2022
Homeवर्धानिवडणूक आयोगाचा स्थापना दिवस साजरा

निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस साजरा

वर्धा :-सेलू तालुक्यातील तळोधी (कुटकी)येथील ग्रामपंचायत मध्ये सोमवार दि.२५ जानेवारीरोजी सकाळी निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस अर्थात (७२वा ) राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करण्यात आला.प्रथमतःकार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.संगिता तोतडे (सरपंच) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर .

महात्मा गांधी यांचे तैलचित्राचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.उपस्थित मान्यवरांनी औचित्यपर मार्गदर्शन केले. सुज्ञ मतदार हा लोकशाही ला बळकट व मजबूत बनवू शकतो.आपन भाग्यवान आहोत आपण लोकशाही देशात राहतो.आणि ईथली जनता सरकार बनविते.पन सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करने तेवढेच गरजेचे असते.आपले मत आणि योग्य सरकार निवडून आपन देशाला प्रगत राष्ट बनवू शकतो.आणि मतदानाचे महत्त्व विषद केले.या वेळी उपस्थित मान्यवर विजय कोल्हे.(पोलीस पाटील) राजू गोहने.बाबाराव होले.आशा तोतडे.वंदना तोतडे.मदतनीस मनीषा वकरकर.अंगणवाडी शेविका कविता बावने.आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular