Tuesday, June 28, 2022
Homeवर्धानिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याचा धुमाकूळ ॲड.धारकर यांना शिवीगाळ:कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याचा धुमाकूळ ॲड.धारकर यांना शिवीगाळ:कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

माहितीनुसार निबंधक कार्यालयातील धार्मिक व कर्मचारीवर्ग उमेश नवनाथे यांना नेहमी मानसिक त्रास देत असल्याने नवनाथे यांनी आज कंटाळून मद्यप्राशन करून शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे

तालुका प्रतिनिधी
विकी (योगेंद्र) वाघमारे
हिंगणघाटहिंगणघाट येथील निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्याने आज दारूच्या नशेत कार्यालयात धुमाकूळ घातला.
मानसिक त्रासाला कंटाळून अनेकांना शिविगाळ केली,काही वकिलांनी केलेल्या तक्रारी नंतर सदर व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
निबंधक कार्यलय येथील ॲड.स्वप्नील धारकर हे काही कामानिमित्ताने गेले असता त्यांना या कार्यालयातील कर्मचारी उमेश नवनाथे याने त्रासाला कंटाळून शिवीगाळ केली.
ॲड.धारकर यांनी त्वरित या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवनाथे या कर्मचारी विरोधात पोलिसात तक्रार केली.पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम २९४,३२४,५०६ या कलमा खाली गुन्हा नोंदविलेला आहे.
यासंदर्भात निबंधक कार्यालयातील धार्मिक यांनीही सदर कर्मचाऱ्या विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवलेली आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular