Saturday, June 25, 2022
Homeवर्धाना.नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

ना.नितीन गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


आमदार समीर कुणावार यांनीही केले रक्तदान

तालुका प्रतिनिधी
विकी (योगेंद्र) वाघमारे
हिंगणघाट

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, तथा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षा व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.


सकाळी १० वाजता तालुक्यातील वडनेर येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले.
शिबिरात विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार
यांनी ५६ वेळा रक्तदान करुन युवकांसाठी आदर्श निर्माण करीत रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.


शिबिरामध्ये सुद्धा त्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले.
याप्रसंगी हिंगणघाट ग्रामीण परिसरातील युवक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.


रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करुन या रक्तदान यज्ञात वडनेर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे,भाजयुमोचे विठू बेनीवार,
नगर परिषदेचे स्वास्थ सभापती सुदर्शन गवळी,पं. स. सभापती शारदा आंबटकर,हिंगणघाट न. प. बांधकाम सभापती छाया सातपुत,भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सौरभ पांडे,विक्की राऊत,भाग्येश देशमुख,तुषार आंबटकर, सौरभ शिवणकर, आकाश बावणे, उमेश कोल्हे, प्रज्वल खैरे, अनिल येळणे, सुनील सरोदे, सुमित ढगे इत्यादीनी सहभाग घेऊन शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular