Monday, June 27, 2022
Homeवर्धानाकाबंदी चौकातील पोलिस कर्मचाऱ्या करिता निःशुल्क थंड 'जलसेवा'

नाकाबंदी चौकातील पोलिस कर्मचाऱ्या करिता निःशुल्क थंड ‘जलसेवा’

तालुका प्रतिनिधी
योगेंद्र वाघमारे
हिंगणघाट

नारायण सेवा मित्र परिवाराचा सेवाभावी उपक्रम

नारायण सेवा मित्र परिवार हिंगनघाट चे वतीने नाकाबंदी असलेल्या शहरातील विविध चौकात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्या करिता थंड पाण्याची निःशुल्क सेवा सुरु करण्यात आली आहे .


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे पालन करण्याकरिता हिंगनघाट शहरातील विविध चौकात नाकाबंदी करण्यात आली असुन पोलिस कर्मचारी, होम गार्ड व नगरपालिका कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत.सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल १२ तास हे कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडित आहे.सध्या स्थितीत उन्हाची दाहकता अधिकच असल्याने चौकातील सेवेतील कर्मचाऱ्याना या प्रतिकुल परिस्थितिचा सामना करावा लागत आहे.अशा प्रसंगी कडक उन्हामुळे पिण्याकरिता थंड पाण्याची निकड असते.ही बाब ध्यानात घेऊन नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने शहरातील विठोबा चौक,मनसे चौक, आंबेडकर चौक,ट्रैवेल बस टी पॉइंट,नंदोरी चौक,कलोडे चौक, कॉटेज हॉस्पिटल चौक,तुकडोजी चौक,नांदगांव चौक या ठिकाणी थंड जलसेवेचा शुभारंभ करण्यात आला असुन लॉकडाउन असेपर्यंत ही सेवा निरंतर सुरु राहणार आहे.या सेवाभावी उपक्रमाकरिता मित्र परिवाराचे पदाधिकारी,सदस्य व देंनगीदाते आपली सेवा प्रदान करीत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular