वाकसुर डोहावर प्रत्यक्ष पाहणी करून अडचणी दुर करण्याचे दृष्टीने नियोजन .
सिंदी ( रेल्वे ) : नगर परिषदला होणारा पाणी पुरवठा वाकसुर डोह १३ किमी मधून होत आहे . पाणी नगर परिषद फिल्टर प्रक्रिया प्लॉटवर शुद्धीकरणानंतर शहरात दर दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो . ९ जूनला अचानक आलेल्या वादळामुळे वाकसुर डोह परिसरात काही विद्यूत खांब पडले आहे . वादळात तारा तुटून विद्यूत पुरवठा खंडीत झाला . त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता .

दर दोन दिवसाआड होणारा पाणी पुरवठा तिन दिवस विलंब झाल्याने नगर सेवकांनी नगराध्यक्षा बबिता तुमाने यांचेशी चर्चा केली असता त्यांनी दिनांक १२ जून रोजी शनिवार ला मुख्याधिकारी नितीन गौर व पाणी पुरवठा विभाग प्रमुख्यांशी चर्चा करून खंडीत पाणी पुरवठ्याचा आढावा घेतला.
या संदर्भात महावितरण अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यूत पुरवठा त्वरीत सुरळीत करण्याबाबत चर्चा केली . त्यात १२ ला दुपार पर्यंत विद्यूत पुरवठा सुरळीत करण्याबाबत अधिकाऱ्यांनी आश्वासित केले . त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग सुकर झाला . या संदर्भात उपस्थित नगर सेवकांनी गावातील बंद असलेले हॅण्डपंप साहित्या अभावी सुरू करण्यात आले त्यामुळे अडचण निर्माण होत असल्याचे सांगीतले त्यावर नविन वार्षिक निवीदा प्रक्रिया पुर्ण झाल्याने सोमवारी हॅण्डपम्प दुरूस्ती साहित्य प्राप्त झाल्याने त्वरीत दुरूस्ती करण्यात येईल असे विभागाने सांगीतले .
यानंतर पुढे पावसाळ्यात येणारे गढूळ पाणी फिल्टर करीता लागणारी तुरटी , ब्लिचींग पाऊडर , क्लोरीन गॅस यांचा साठा पाणी पुरवठा फिल्टर प्लाँटला भेट देवून नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी केली . फिल्टर प्लॉट मध्ये फिल्टर साठी लागणारी सॅण्ड स्वच्छता करण्याची तसेच टाकी स्वच्छता करण्याची विस्तारपुर्ण चर्चा करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे विभागाला सुचना दिली . यानंतर लागलीच मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांनी वाकसुर डोह येथे जाऊन पाहणी करून यात येणाऱ्या अडचणींना ताबडतोब दूर करण्याचे नियोजन करण्यासंबंधी दिशा निर्देश मुख्याधिकारी नितीन गौर यांनी दिले . याप्रसंगी पाणी पुरवठा विभाग प्रमुख सुभाष कवटेकर , प्रशासकिय अधिकारी सिद्धेश्वर महाजन , मोहसिन , नगरसेवक आशिष देवतले, ओमपकाश राठी, सधाकर वल्के, रमेश रर्दक, नगरसेविका अजया साखळे ,पुष्पा सिरसे,सुमन पाटील,यांची उपस्थिती होती.