तालुका प्रतिनिधी
विकी (योगेंद्र) वाघमारे
हिंगणघाट
अखिल भारतीय सफाई मजदुर कांग्रेस कामगार संघटना ७२६२ , स्वतंत्र ट्रेड युनियन हिंगणघाट शाखा तर्फे नगरपालिका मुख्याधिकारी जगताप साहेब यांना वर्धा जिल्हाध्यक्ष मानसिंह झांझोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष रोहित बक्शी यांनी नगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करावे या करिता निवेदन दिले.

निवेदनात सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कमेची पहिल्या टप्प्याची रक्कम मिळावी,१२,२४ वर्षी पदोन्नती ची रक्कम देण्यात यावी. नगरपालिका तर्फे मागील तीस, चाळीस वर्षांपूर्वी सफाई कामगारांना घरे बांधून दिली होती परंतु अजूनही नगरपालिके ने त्या घराचे पट्टे कर्मचाऱ्यांचे नावाने केलं नाही तर तो पट्टे कर्मचाऱ्यांचे नावाने करावेत ही मागणी संघटनेने केली आहे.
या वेळी संघटनांचे शहरं महामंत्री-विककी सांडे, उपाध्यक्ष अभिमन्यू मखरे, सचिव आदर्श चव्हाण, सहसचिव रणजित मोगरे, कोषाध्यक्ष शेखर राणे, वरिष्ठ नेते श्री बाबुलाल नकवाल,बादलसिंह रेवते, दिलीप चव्हाण, संजय मखरे, कन्हैया बक्शी,रामू सांडे, सेवक ब्राह्मणे इत्यादी पदाधिकारी आणि सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.