तालुका प्रतिनिधी
समुद्रपूर
तालुक्यातील नागपूर चंद्रपूर महामार्गवरील नंदोरी चौरस्त्यावर रोड क्रास करीत असतांना दुचाकी व कार च्या धडकेत एक जण ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली.अपघातात ठार झालेल्या मृतकाचे नाव दिवाकर चंफत निशाणे वय 42 रा. नंदोरी असे आहे. तर कमलाकर केवलंदास पाटील रा नांदोरी या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नंदोरी येथील रहिवाशी दिवाकर निशाणे आणि कमलाकर पाटील दोघेही दुचाकी क्रमांक एम एच 32 ए ओ 0259 ने महामार्ग चौरस्त। व ओलांडून जात असतांना नागपूर कडून चंद्रपूर कडे जात असलेली कार क्रमांक एम एच 31 इ ए 7085 पुढे अचानक दुचाकी आल्याने धडक बसली. यात दुचाकी चालक दिवाकर निशाणे यांचा जागीच मृत्यू झाला तर कमलाकर पाटील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
घटनेचा तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांचे मार्गदर्शनातपोलीस उपनिरीक्षक अपेक्षा मैश्राम, पोलीस कॉन्स्टेबल रामहरी सिरसाट करीत आहे.