Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाधावत्या ट्रकच्या कॅबिनने घेतला पेट

धावत्या ट्रकच्या कॅबिनने घेतला पेट

चालकाचा जीव थोडक्यात वाचला

वर्धा – राष्ट्रीय महामार्ग नागपूर अमरावती महामार्गावर आज सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान ट्रकच्या कॅबिन ने पेट घेतला.

 वाडी येथून ट्रक क्र.महा 04 जी एफ 3257 चा ट्रक लोखंडाचे साहित्य मुंबई येथे घेऊन जात असताना नागपूर अमरावती महामार्गवरील सावळी (बु) फाट्याजवळ अचानक पेट घेतला चालकाला माहिती होताच चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या कडेला घेऊन थांबविला आणि आपला कसाबसा जीव वाचवला. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी पोहचली मात्र अग्निशामक नसल्यामुळे  ओरीयंटल टोल प्लाझा वरील टँकर पाठवून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे तोपर्यंत ट्रकची संपूर्ण कॅबिन जळून खाक झाली होती.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular