Saturday, May 28, 2022
Homeवर्धाधामणगाव ते आमगाव रस्त्याची दुरावस्था

धामणगाव ते आमगाव रस्त्याची दुरावस्था


# रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

सेलू :
तालुक्यातील हिंगणी लगतच्या धामणगाव ते आमगाव पर्यंतचा आठ कि.मी. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने वाहन धारक त्रस्त झाले आहे.काही ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहन धारकांना पडत आहे.या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे व संबंधित लोकप्रतिनिधीचे पुर्णपणे दूर्लक्ष असून याबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


आठ कि.मी.चा रस्ता पूर्णपणे खिळखिळा झाला आहे. म्हण्यास आठ कि.मी.चा रस्ता असलातरी तो प्रवासा दरम्यान अठ्ठावीस कि.मी.ओलांडून जात असल्याचा प्रत्यय येतो.प्रवाश्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करणारा हा रस्ता जंगलाने वेढलेला आहे.

हिंगणी चे सामोर असलेले धामणगाव , सोंडी , सालई कला, आमगाव या गावी जाताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. या गावांना लागून सभोवताल जंगल वस्ती असल्याने वन्य प्राण्यांचा आधीच धोका असतो अशात वाहनात बिघाड आल्यास देवच आठवतात. माजी जि.प.अध्यक्ष चित्रा रणनवरे ह्या इकडच्या सालईच्या असल्याने त्यांचे कारकिर्दीत रस्त्याचे नविनीकरण झाले होते.त्यांचे कार्यकाल संपले तसेच या रस्त्याची अवदशा पालटली व आता होता नव्हत्यातच मजरा आहे.सध्या हिंगणी सर्कलचे जि.प.सदस्य दबंग राजकारणी समजल्या जाणारे राणा रणनवरे हे आहेत. जि.प. मधे ही आता त्यांचेही कुणी ऐकत नसल्याचे तेच बोलून दाखवित भाजप ला रामराम ठोकून दूसर्या पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याबाबत खमंग चर्चा होती.परंतू त्यानंतर गरमावलेले वातावरण थंड होत निवळले.म्हणून त्यांंचे कडून ही रस्त्याचे दिवस पालटतील अशी खजिल अपेक्षा ठेवणे चूकीचे होईल.म्हणून नागरिकांनीही देवाचे भरवशावर हा रस्ता सोडून दिला आहे.कोरोना महामारीचे काळापासून मंदिरे ही कुलुपबंद असून देव ही बंदिस्त असल्याने केव्हा तो प्रसन्न होईल ची वाट पाहण्या पलीकडे नागरिकांसामोर दूसरा रस्ता नाही.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular