सेवाभावी कार्यकर्त्यांचा सत्कार
सेवाग्राम :- मानवतेचे महान पुजारी वं.राष्टसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्म दिवस ३० एप्रिल रोजी ग्रामजयंती म्हणून साजरा करण्यात आली. यावेळी परीसरात स्वच्छता श्रमदान.करून सायंकाळी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.

या प्रसंगी सामुदायिक प्रार्थना नित्यनेमाने करनारे श्री गुरूदेव शेवक,प्रचारक यांचा औचित्यपर शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुरूदेव प्रेमी देवरावजी बेले, नारायण बावणे, पवनसुत हनुमान देवस्थान कमेटीचे अध्यक्ष दयाराम रक्षीके, सुधाकर गायकवाड यांना या प्रसंगी शाल व श्रीफळ, ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला.तसेच बाळूकाका ढोले यांच्या आरोग्यासाठी व कोरोना संसर्ग जाण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व. राष्टसंत श्री तुकडोजी महाराज यूवक युवती विचार मंचाचे जिल्हा सचिव सुरेंद्र बेलूरकर यांनी केले.ग्रामजयंती पर्वावर मान्यवर सुधाकर गायकवाड, सुदर्शन उगले, सुरेद्र बेलूरकर यांनी वं.राष्टसंताच्या कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.आभार प्रदर्शन गुरूदेव सेविका शारदा नासरे यांनी केले.कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी भाग्यश्री उगले.सामाजिक कार्यकर्ते राजू नवघरे.शांताराम नासरे.सौ.मेहरे यांनी परीश्रम घेतले.समारोप राष्टवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.