Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाधनगर समाजाचा आरक्षणाचा सभागृहात उपस्तित करा

धनगर समाजाचा आरक्षणाचा सभागृहात उपस्तित करा

तालुका प्रतिनिधी
विकी (योगेंद्र) वाघमारे
हिंगणघाट

आमदार कुणावार यांना धनगर ऐक्य परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले,येत्या पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षनाचा उपस्तित करावा तसेच विविध मागण्या संदर्भात धनगर ऐक्य परिषद हिंगनघाट शाखेच्या वतीने आ समीर कुणावार यांना निवेदन देण्यात आले.


धनगर समाज गेल्या ७० वर्षापासून आरक्षणाची मागणी शासन दरबारात मांडत आहे.परंतु त्यांचे मागनीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केल्या जात आहे. परंतु या मतदार संघातील लोकप्रतिनिधि म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडावा .तसेच जे आदिवासी समाजाला तेच धनगर समाजाला यानुसार मागील वर्षाचे एक हजार कोटि व चालू वर्षाचे एक हजार कोटि असे एकूण दोन हजार कोटि धनगर समाजाला उपलब्ध करुन द्यावे. आमदार निधी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक हिंगनघाट तालुक्यात उभारण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करन्यात आली आहे.यावेळी समन्वयक गणेश उगे,यादव तुराळे,वासुदेव पडवे, रमेश घोड़े,कवडू शेळके, प्रवीण घुरड़े आदी पदाधिकारी उपस्तित होते.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular