वर्धा : पाडेगाव येथील एका शेतकऱ्यांनी धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत शेतात तीन लाख रुपये खर्च करून विहिर बांधकाम पूर्ण केले मात्र त्याचे अनुदान अद्याप मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरीत उतरून आंदोलन केले .

पाडेगाव येथील शेतकरी सुरेश मुडे यांनी आज ११ जून रोजी शुक्रवार ला सकाळी ७ वाजल्यापासून विहिरीमध्ये उतरून आंदोलन सुरू केले.
गेल्या २०२० मे महिन्यापासून धडक सिंचन योजनेचे पैसे मिळाले नाही एक वर्ष पूर्ण झाले तरी पंचायत समिती वर्धा यांनी शेतकरी सुरेश सदाशिव मुडे पडेगाव वर्धा या शेतकऱ्याचे धडक सिंचन योजनेचे पैसे दिले नाही.
आज या शेतकऱ्यावर तीन लाख,
रुपयाचे कर्ज झाले. पंचायत समिती वर्धाने धडक सिंचनचे पैसे जर मिळाले नाही तर या शेतकऱ्यांना आत्मदहन करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष पडेगाव अध्यक्ष मंगेश मुडे, दिनेश घायवट, आशिष अंतूरकर, अमोल तडस, धीरज कामडी, गिरीश वैद्य, सूरज कानेटकर, सुरेशराव मुडे, सरपंच अनंतराव हटवार प्रहरचे देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख राजेसभाऊ सावरकर, नावेद पठाण, महेंद्र डंभारे, मुकेश वाघमारे आणि पाडेगाव मधील शेतकरी उपस्थित होते,