Saturday, June 25, 2022
Homeवर्धादोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू

दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू


देवलीतील पेट्रोल पंप जवळ घटना

देवळी: देवळी येथील जोशी पेट्रोल पंपाच्या मागील लेआऊट मध्ये सायंकाळीच्या सुमारास चार बालके खेळायला गेले असता दोन बालकांनी खड्ड्यात भरलेल्या पाण्यात उतरले, पाणी खोल असल्याने दोन्ही बालक पाण्यात बुडून अंत झाला .या घटनेने देवळी शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
उमेद अली, तुषार शेळके अशी मृत झालेल्या बालकांची नावे आहे.येथील जोशी पेट्रोल पंपामागे चार बालके खेळायला गेले दोघेजण खेळत असताना खड्ड्यातील पाण्यात जाण्याचा मोह आवरला नसल्याने खड्ड्याच्या पाण्यात खेळायला उतरले , खड्यात पाणी जास्त असल्याने दोघेही बालक पाण्यात बुडाले बाहेर उपस्थित असलेले दोन बालके घराच्या दिशेने पळत येऊन कुटुंबियांना घटनेची माहिती दिली .
या घटनेची माहिती देवळी पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले . खड्ड्याच्या पाण्यात उमेद अली व तुषार शेळके या दिघाचा बुडून मृत्यू झाला . दोघांनाही पाण्यातून बाहेर काढण्यात आले . त्यानंतर रुग्णलयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोन्ही बालकांना मृत घोषित केले . या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून देवळी शहरावर शोककळा पसरली .

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular