देवळी: पोलीस स्टेशन मध्ये पञकार दिनाच्या अनुषंगाने पञकार दिनाचा कार्यक्रम आयोजित करून पञकार बांधवाना सन्मानित करण्यात आले.
पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पत्रकार हा समाजाचा आरसा असून आपल्या लेखनीतून तो समाजाला दिशा देण्याचे काम करीत असून चुकलेल्यांना योग्य मार्गावर चालण्याचे संकेत आपल्या बातमीतून देत असल्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी सांगितले.
आजच्या सोशल मिडियामध्ये घडलेल्या बातमीची खातरजमा करूनच येथील पञकार हे बातम्या देण्याचे काम करीत असल्याचे पुढे सागितंले
यावेळी जेष्ठ पत्रकार शेख सत्तार यांनी पञकाराच्या वतीने बोलतांना सांगीतले की, पञकार व पोलीस अधिकारी ,कर्मचारी पोलीस पाटील यांचा समन्वय असावा व घडलेल्या घटनांची माहिती पञकांराना मिळावी या पोलीस स्टेशनला पञकांराना सन्मानित करण्याचा प्रथमच प्रयोग ठाणेदार यांनी केला असल्याची भावना बोलून दाखविली.
यावेळी पञकार शेख सत्तार
विलास जोशी, हरिदास ढोक, गणेश, शेंडे, समीर शेख , विलास खोपाळ, योगेश कांबळे, विनोद घोडे, अविनाश नागदिवे, सागर झोरे, गजानन पोटदुखे इत्यादी पत्रकार बांधवाना पुष्पगुच्छ आणी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रमेश ढोकणे. पोलीस उपनिरीक्षक मल्हारी तायीकोटे , पोलीस कर्मचारी देवळी तालुक्यातील पोलीस पाटील महिला पोलीस पाटील व होमगार्ड कर्म चारी यांची उपस्थिती होती.