Tuesday, June 28, 2022
Homeवर्धादेवळी नगर पालिकेने बसविलेल्या मुत्रीगृहाचे दरवाजे गेले चोरीला.

देवळी नगर पालिकेने बसविलेल्या मुत्रीगृहाचे दरवाजे गेले चोरीला.

देवळी : शहरात गर्दीच्या ठिकाणी नगर पालिका कडून बस स्टॉप च्या भागात , तर अन्य गर्दीच्या ठिकाणी नगर पालिकेने मुत्रीगृह उभारले आहे.


शहरामध्ये जवळपास दहा मुत्रीगृहे वापरणीत आहे. बाहेरून येणाऱ्या प्रवाशी आणि नागरिकासाठी फार सोयीची व्यवस्था देवळी नगर पालिकेनी उपलब्ध करून दिली आहे. त्या स्वछतागृहची स्वछता नगर पालिकेतील स्वछता विभागातील कर्मचारी कडून केली जाते. परंतु काही चोरटयांनी त्या स्वछता गृहाचे दरवाजे चोरून नेली आहे. त्यामुळे महिलांना अडचण निर्माण झाली आहे.
ही सरकारी मालमत्ता आहे त्याचे असे नुकसान करणे, चोरून नेणे आणि भंगारात कवडीमोल विकणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. सरकारी मालमतेचा किंवा शेतकरी बांधवाचे शेतीउपयोगी साहित्य हे भंगार विक्रेत्यांनी चोरट्या जवळून घेऊ नये असे ताकीद पत्र नगर पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी स्क्रप मर्चंट यांना दयावे. जेने करून सरकारी मालमतेचे आणि शेतकरी बांधवाचे नुकसान होणार नाही. नगर पालिकेने चोरी गेलेल्या स्वच्छता गृहाचे दरवाजे बसवून महिलांची होणारी अडचण दुर करण्याची मागणी होत आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular