हिंगणघाट :
आमदार समीर कुणावार यांच्या आमदार निधी अंतर्गत दहेगाव गोसावी ते केळझर रोड पर्यंत २० लक्ष नालीचे बांधकाम भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दहेगाव गोसावी येथील नीवासी यांची दहेगाव गोसावी ते केळझर रोड पर्यंत नाली ची मागणी अनेक वर्षापासून होती. दहेगाव गोसावी येथील निवासी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम समीर कुणावार यांनी हे नागरिकांचे स्वप्न पूर्ण केले. या नालीमुळे दहेगाव गोसावी या गावाला विकासात्मक दृष्टी लाभल्यामुळे आज अनेक वर्षापासून असणारी ही मागणी पूर्ण झाल्याने या गोष्टीचा सर्व सन्माननीय गावकरी मंडळींनी व निवासी यांनी आनंद व्यक्त केला.
सदर या भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे, जिल्हा परिषद सदस्य किशोर शेंडे, गावातील सरपंच संदीप वाणी,अरविंद बळवंतराव धंदरे,डॉ. सुरेश धंदरे, किसना वाकडे, उमेश राऊत, सदाशिवराव माताडे, श्याम पिठाले, सुरेंद्र तिवाडे माजी सरपंच दहेगाव गोसावी, विजय तिजारे,अरुण तिजारे, मोहन आंबाखाये, मनोहर धंदरे, रामचंद्र ठाकरे, सुनील रोकडे, सुधाकर खाडे, प्रवीण खाडे व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.