Saturday, June 25, 2022
Homeवर्धातोरगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

तोरगाव येथे वीज पडून दोघांचा मृत्यू

(प्रशांत राऊत)
ब्रम्हपुरी:-
ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव (भु.)येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली.


मृतक अश्विनी कमलनायक मेश्राम तोरगाव(16)व सुरेश रामटेके तोरगाव (55)हे नेहमीप्रमाणे बकऱ्या चारन्यासाठी शेतशिवारात गेले असता अचानक वातावरणात बदल होऊन सुसाट वारा,पाऊस व विजांचा कळकळाट सुरू झाला मेघगर्जनेच्या भीतीमुळे अस्ताव्यस्त होऊन त्यांनी एका झाडाचा सहारा घेतला परंतु दुर्दैवाने त्याच झाडावर वीज पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मेश्राम व रामटेके परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular