Sunday, May 29, 2022
Homeवर्धातहसीदाराने पकडली दीड ब्रास गिट्टी

तहसीदाराने पकडली दीड ब्रास गिट्टी

🔶 गिट्टी चोरीची की बिना रॉयल्टी ?
🔶 माझी नगरसेवकाचा ट्रॅक्टर जप्त.

सेलू
तहसीलदार, नायब तहसीलदार व स्थानिक पालिकेचे मुख्याधिकारी असा तिहेरी अधिभार सांभाळणाऱ्या नितीन गौर यांनी मंगळवारी दुपारी दीड ब्रॉस गिट्टी पकडली. सदर वाहन सिंदी पोलीस ठाण्यात जमा करून दंडात्मक कार्यवाही प्रक्रिया सुरू आहे.


….याबाबत तहसीलदार नितीन गौर यांनी सांगितले की, ते नगर परिषदेच्या बैठकीला हजर राहण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांना मुखबिराकडून माहिती मिळाली की, दीड ब्रास गिट्टी भरलेला ट्रॅक्टर शहरात येत आहे. त्या सूचनेवरून नितीन गौर यांनी भररस्त्यात ट्रॅक्टर क्रमांक MH-32 / P- 3793 अडविला. वाहनाची तपासणी करून चालक दिवाकर कांबळे (30) रा. दिग्रज यांच्याकडे रॉयल्टीची मागणी केली. वाहनचालकाकडे शासनाचा कोणताही परवाना नाही असे त्याने तहसीलदार गौर यांना सांगितले. गाडीमालक प्रभाकर काळबांडे (माजी नगरसेवक) यांच्या सूचनेवरून एका मंदिरात ही गिट्टी नेत असल्याचा खुलासा वाहनचालक दिवाकरने केला. परिणामी शासनाचा परवाना नसल्यामुळे तहसीलदार गौर यांनी गिट्टीसहित वाहन पोलिस ठाण्यात जमा केला. याप्रकरणी तहसील कार्यालय सेलू यांनी दंडात्मक कारवाई केली अथवा नाही, हे समजू शकले नाही.
…..माजी नगरसेवक प्रभाकर काळबांडे हे मागील 20 वर्षांपासून वर्धा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर विटभट्ट्या चालवितात. सोबतच बिल्डिंग मटेरिअर सप्लायचा धंदा देखील करतात. पाच वर्षांपूर्वी यांच्याच धावत्या वाहनाखाली सापडून करण चौव्हान या तरुण युवकाचा मृत्य झाला होता. त्या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू असल्याचे समजते. गवंडी बांधकाम मजूर युनियनच्या लाभार्थी मंडळीत प्रभाकर काळबांडे यांची पत्नी व मुलाचा समावेश आहे. घरचे सदन असणारे प्रभाकर काळबांडे यांना काही भ्रष्ट अधिकारी युनियनच्या नेत्यांनी कशाच्या आधारे पंतप्रधान कार्यालयाकडून मिळणाऱ्या योजनेचा लाभ मिळवून दिला हे एक कोडेच आहे.
चौकट
रेतीचोर हैराण
तहसीलदार नितीन गौर यांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे परिसरातील रेती माफियांमध्ये दहशत पसरली आहे. वाकसुर, कांढळी, आष्टा, तांभारी, चाकूर, पारडी, हत्तीगोठा आणि शेडगाव येथून नियमित रेतीची मोठ्या प्रमाणात या शहरात अवैध वाहतूक होते. परंतु स्थानिक पोलीस मात्र, केवळ हप्ते गोळा करण्यात मश्गुल आहे.
गजानन गिरडे, शेतकरी

बॉक्स

सदर प्रकरणी 1 लाख 17 हजार 580 दंड ठोठावला आहे.
नितीन गौर . तहसीलदार सेलू

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular