Monday, June 27, 2022
Homeवर्धातळेगाव टी पॉइंटवर कार व दुचाकीचा अपघात

तळेगाव टी पॉइंटवर कार व दुचाकीचा अपघात

दुचाकीस्वार भाऊ- बहीण गंभीर जखमी

आर्वी : मोर्शीहुन पाचोड येथे मोटरसायकलाने जात असताना तळेगाव टी पाइंटवर कार ने धडक दिली .या अपघातात मोटरसायकलवरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पाचोड येथील गणेश राठोड वय 26 आणि मंदा राठोड वय 21 हे दोघे बहीण भाऊ मोटारसायकल क्रमांक MH32-AD 4298 ने जात असताना
नागपूरहून अमतावतीकडे जाणाऱ्या भरधाव कार MH-27 BF 0317 ने धडक दिल्याने मोटारसायकल स्वार बहीण भाऊ गंभीर जखमी झाले .
त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेची नोंद तळेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular