तळेगाव शामजी पंत : येथे झालेल्या कबड्डी सामन्यात नांदगाव (ख)येथील पंजाबराव देशमुख कबड्डी टीम प्रथम क्रमांकावर या कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोज 14 फेब्रुवारीला घेण्यात आला .

तळेगाव शामजी पंत येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आज घेण्यात आला. पहिले पारितोषिक नांदगाव खंडेश्वर येथील पंजाबराव देशमुख क्रीडा मंडळ यांनी पटकावला त्या विजेत्यां संघाला ट्रॉफी व पहिले बक्षीस 15 हजार रुपये रोख शिवसेनेचे आष्टी तालुका संघटक विकास परकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी मान्यवर मंडळी ,मंडळाचे कार्यकर्ते,आणि क्रीडा प्रेमी उपस्थित होते.