दोघांचे पाय तुटले, एकाच्या डोक्याला मार
तळेगांव शा पंत :- तळेगांव नजीक असलेल्या देवगाव फाट्याजवळ दोन दुचाकी एकमेकींना धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये मोटारसायकल क्र.MH 27 BC 7282 ही वरुड तालुक्यातून आर्वीच्या दिशेने जात होती. तर MH27 Q 5753 ही आर्वीवरून आष्टीच्या दिशेने जात असतांना तळेगांव नजीकच्या देवगाव फाट्याजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर टक्कर झाल्याने या अपघातात चार जण जखमी झाले. आहे. जखमी मध्ये अक्षय शेंडे रा. महावीर नगर,अमरावती , बाबू धवस रा. आष्टी, अनिकेत कडू रा. बोरगाव हातला,प्रवीण पांढरे रा. जामगाव खडका हे चौघे जण चांगलेच जखमी झाले असून यामध्ये दोघांचे पाय तुटले असून दोघांच्या डोक्याला मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगांव पोलीस दलाचे जमादार संजय शिंगणे, राहुल अमोने, रोशन करलुके यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी पाठविले.