तळेगाव (श्यामजीपंत) :- तळेगांव नजीकच्या भिष्णुर फाट्यानजीक एका दुचाकीचा अपघात होऊन एक मुलगी जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
मृतक मुलीचे नाव कु रुपाली योगेश लसंनकर (वय 13) रा. खापरखेडा असे असल्याचे पोलिसांनी सांगितले तर जखमी मध्ये मंगेश उध्वव लसनंकर (वय 35) रा. खापरखेडा, बेबी उद्धव लसनकर (वय 55) रा. खापरखेडा असे असल्याचे सांगण्यात आले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघेही MH 40 AN 5781 क्रमांकाच्या प्लसर मोटरसायकलने खापरखेडा येथून अचलपूर येथे जात होते. तळेगांव नजीक असलेल्या भिष्णुर फाट्याजवळ वाहणावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट रस्त्याच्या खाली उतरले व अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळी तातडीने पोहचनाऱ्या नागरिकांनी पोलीस व रुग्णवाहिकाला फोन करून माहिती दिल्याने तळेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली व जखमींना तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार गजानन बावणे, अमोल इंगोले,रोशन करनुके गृहरक्षक दलाचे मुकद्दर यांनी ही कारवाई केली .