Tuesday, June 28, 2022
Homeवर्धातळेगांव ग्रामपंचायत साठी सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड संपन्न

तळेगांव ग्रामपंचायत साठी सरपंच व उपसरपंच पदासाठी निवड संपन्न

तळेगांव शा पंत – आज तळेगांव ग्रामपंचायत च्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सकाळी 10 वाजतापासून सुरुवात झाली यामध्ये एकूण सरपंच पदासाठी दोन तर उपसरपंच पदासाठी तीन उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. हात उंचावून मतदान करण्याचा पद्धतीने मतदान झाले व त्यामध्ये छबु खंडार व त्रिशूल भुयार हे विजयी झाले यामध्ये
सरपंच पदासाठी दुर्गा जनार्दन गाडगे व छबुताई रमेश खंडार असे दोन अर्ज दाखल झाले होते.

त्यापैकी दुर्गा गाडगे यांना 4 मते तर छबु खंडार यांना 9 मते मिळाली बाकी 4 सदस्य तटस्थ राहिल्याने छबु खंडार यांना सरपंच पदासाठी विजयी घोषित करण्यात आले. त्याचबरोबर उपसरपंच पदासाठी चंद्रशेखर जोरे, रुपेश बोबडे व त्रिशूल भुयार असे तिघांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी जोरे यांना 4 मते बोबडे यांना 4 मते व त्रिशूल भुयार यांना 9 मते मिळाल्याने भुयार यांना उपसरपंच पदी विजयी घोषित करण्यात आले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular