Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाडॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालयात छत्रपती शिवाजी जयंती साजरी

डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालयात छत्रपती शिवाजी जयंती साजरी

हिंगणघाट :

    स्थानिक डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयती उत्साहात साजरी करण्यात आली. 
   सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थासचीव अनील जवादे आणि प्रमुख अथिती प्राचार्य एस. एम. राऊत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. प्रमुख उपस्थिती म्हणून मंचावर उपप्राचार्य एच.पी. गुडदे, पर्यवेक्षिका सुनिता बनसोड उपस्थित होते.
    याप्रसंगी शिवरायांचे जीवनचरित्र, त्यांची राज्यपद्धती, त्यांची युद्धनिती, अर्थनिती, आणि पर्यावरण रक्षण इत्यादी विषयांवर प्राचार्य एस.एम.राऊत, निसार शेख,उमेश ढोबळे, महेश माकडे,गोपालकृष्ण मांडवकर , प्रभाकर भगत, विजय महाजन , सुधाकर थूल यांनी माहिती दिली. 
    आपल्या अध्यक्षीय भाषणात अनिल जवादे,म्हणाले देशाला आज छत्रपती शिवरायांच्या कृषी नीती आणि राज्यव्यवस्थेची नितांत गरज आहे. 
    या कार्यक्रमास सर्व शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गजानन भोंग यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. प्रशांत भटकर यांनी केले.
Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular