ट्रक घडकेत झाला होता गंभीर जखमी
समुद्रपूर :
नागपूर-चंद्र चंद्रपूर महामार्गावर अज्ञात ट्रकच्या धडकेत राष्ट्रीय पक्षी मोर हा गंभीर अवस्थेत पडून दिसल्याने नागपूर वरून चंद्रपूर कडे जाणारी विद्यार्थी चैतन्य शेडेकर गौरव सुरासे गणेश दांडेकर यांना दिसले त्यांनी समुद्रपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालय इथे आणले असता ड्युटीवर असलेले डॉक्टर उपवंशी हजरअसूनही लक्ष न दिल्याने मृत्यू झाला वेळेवर उपचार दिला असता तर मोराचा जीव वाचला असता.
मोराच्या मृत्यूनंतर सदर विद्यार्थ्यांनी समुद्रपूर येथील वन विभागाचे वनक्षेत्राचे अधिकारी वैशाली बारेकर यांच्या हवाले करण्यात आले मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याची मान्यता असून अधिकाऱ्यांनी संबंधित पशुवैद्यकिय अधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आम्ही नागपूर हुन चंद्रपूरला जात असतानी आम्हाला साई मंदिर जवळ गंभीर अवस्थेत मोर दिसला असतानी आम्ही समुद्रपूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले असतानी मोर जिवंत होता आम्ही तेथील कर्मचारी यांना डॉक्टरचा विचारणी केली असतानी नाष्टा करायला गेली आहे सदर डॉक्टरची कॉटर जवळ असल्याने आम्ही डॉक्टरला आवाज दिले पण डॉक्टर साहेब पंधरा मिनिटं आले नाही आणि त्यातच मोराचा मृत्यू झाला कदाचित त्या मोराला वेळेवर उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता
चैतन्य शेडेकर चंद्रपूर
मी माझे निवासस्थान आवरून लगेच पशुवैद्यकीय दवाखान्यात आलो असता मोराला डोक्याला मार लागल्याचे निष्पन्न झाले व त्याच्या त्याचा मृत्यू झाला
डॉक्टर वी. उपवंशी पशु वैद्यकीय अधिकारी