Sunday, May 29, 2022
Homeवर्धाटेंभा येथे घरावर विज कोसळल्या मुळे मोठे नुकसान

टेंभा येथे घरावर विज कोसळल्या मुळे मोठे नुकसान

येरला : हिंगणघाट तालुक्यातील टेंभा येथे दि.30 ऑगस्ट रोजी प्रमोद वरभे यांच्या घरावर विज कोसळल्या मुळे घरातील साहित्याचे व घराचे मोठे नुकसान झाले.


यामध्ये प्रमोद वरभे यांचे घरातील 2 फॅन, 1 फ्रिज, 1 टीव्ही आणि मोबाईल यांचे अंदाजे 50 हजार रुपयाचे नुकसान झाले. तर त्यांच्या घराला लागूनच असेलेले विनोद वरभे यांचे 1 टीव्ही, 2 फॅन असे 15 हजार रुपये नुकसान , संजय उगेमुगे यांचे घरातील 1 फ्रिज, 2 फॅन असे 20 हजार रुपयाचे नुकसान, अंकुश महाजन यांच्या घरचे 1 फॅन, 1 टीव्ही आणि घरातील पूर्ण इलेक्ट्रिक विदयुत प्रवाह शॉट झाल्यामुळे 20 हजार रुपयाचे नुकसान, हनुमान हुलके यांच्या घरातील 2 फॅन, 1 टीव्ही असे 15 हजार रुपयाचे नुकसान तर गजानन तडस यांचे घरचे 1 फॅन असे 20हजार रुपयाचे नुकसान त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पंचायत टेंभा चे 10 स्ट्रीट लाईट तुटल्यामुळे यांचे ग्रामपंचायत चे सुद्धा मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने याची पाहणी आणि पंचनामे करून शासनाने नुकसान ग्रस्ताना आर्थिक मदत करावी अशी मागणी गावकरी व सरपंच यांनी केली.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular