समुद्रपुर तालुक्यातील वासी गावात एका इसमाची जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना रविवारी ता.21 सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांना माहिती मिळताच या प्रकरणी एका आरोपीला अवद्या काही तासांतच अटक केली.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वासी गावातील नेताजी विद्यालयासमोर परमेश्वर जनार्दन वागदे वय ४३ वर्ष याची कोण्हीतरी धारदार शस्त्राने हत्या केल्याची माहिती गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते यांना मिळताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता येथिल परमेश्वर जनार्दन वागदे यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेसंबंधी तपास करीत याच गावातील संशयित आरोपी अपुर्व गोपाळराव नगराळे वय ५५ वर्ष याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता परमेश्वर जनार्दन वागदे याची जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली दिली. मुत्यक परमेश्वर जनार्दन वागदे याला दारुचे व्यसन होते.तो नेहमी आरोपीची पत्नी अंगणवाडी सेविकेला ऑक्टोबर महिन्यात २०२० दारुच्या नशेत शिवीगाळ केली होती यावेळी त्याला आरोपीने अंगणवाडीतून हाकलून लावले. यावेळी दोघांत बाचाबाची झाली.यांनतर मुत्यक हा नेहमीच आरोपीला दारू पिऊन शिवीगाळ करून परीवार संपविण्याची जिवे मारण्याची धमकी देत होता.१९ मार्चला रात्री सुध्दा मुत्यक
परमेश्वर जनार्दन वागदे याने दारुच्या नशेत शिवीगाळ केली होती.याचाच मनात राग बाळगून अपुर्व गोपाळराव नगराळे याने सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरा जवळील नेताजी विद्यालयासमोर परमेश्वर जनार्दन वागदे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार केले.व तिथून निघून गेला.या हत्ये संबंधी पोलिसांनी आरोपी अपुर्व गोपाळराव नगराळे याला ६ वाजता नंदोरी येथील बहिण सुचिका नगराळे यांचे घरुन अटक केली आहे.पुढिल तपास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांतजी होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, प्रभारी उपविभागिय पोलिस अधिकारी पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांचे मार्गदर्शन गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल दहिभाते पोलीस उपनिरीक्षक दिलीप निंबाळकर, पोलिस कर्मचारी प्रशांत ठोंबरे,रवि घाटुर्ल, योगेश सोरटे, नरेंद्र बेलखेडे,आदी करीत आहे.