Monday, June 27, 2022
Homeवर्धाजीवन सुंदर असुन सकारात्मक बघा--पोलीस उपनिरीक्षक भांबुरकर

जीवन सुंदर असुन सकारात्मक बघा–
पोलीस उपनिरीक्षक भांबुरकर


अंतोरा : येथील स्व. वत्सलाबाई मोहाड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रतिभा कळंबे तर प्रमुख अतिथी म्हणून वाहतूक हवालदार शिंगणे, प्रा. नागलिया, प्रा. चौधरी मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शिंगणे यांनी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमाचे पालन करावे.

तर भांबुरकर यांनी जीवन सुंदर असुन आपला पाहण्याची दृष्टी बदला विद्यार्थ्यांनी गाडी चालवताना इतरांचा विचार करावा. आपली जबाबदारी ओळखावी. कारण आपण कुटुंबातील घटक आहे याची जाणीव असावी. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या कळंबे यांनी विद्यार्थ्यांनी स्टंट करु नये, आयुष्य भर परिणाम भोगावे लागतात असे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ढोरे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. उमेश पवार यांनी केले. प्रा. चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. भगत,ताथोडे पावडे, पोटे, बोहरुपी, सौ. राऊत, सुनील भाऊ गोहाड, शशी वानखेडे व स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular