जि. प. शाळा जळगाव ने साकारला स्त्युत्य उपक्रम

आर्वी : बालक हे संस्कारक्षम असल्याने लहानपणापासूनच त्याच्यावर जाणीवपुर्वक संस्कार करणे गरजेचे आहे, या संकल्पनेतुन जळगांव शाळेचे मुख्याध्यापक उमेश आसटकर यांनी त्यांच्या शाळेत सुंदर प्रार्थना हॉलची निर्मिती केली. त्यात सर्वसमावेशक प्रार्थना , समुहगीत, देशभक्तीपर गीत , संविधान , प्रतिज्ञा इत्यादीचा समावेश केलेला आहे.केंद्रप्रमुख श्री वनस्कर यांनी ऑडिओ सिस्टीम शाळेला भेट देत शिक्षकांसह विदयार्थाचा उत्साह वाढविला. तालासुरात म्हटल्या गेलेल्या परिपाठात विद्यार्थासह ऐकणारेही मंत्रमुग्ध होतात . यासाठी त्यांना स.अ. रंजना उईके , श्रीमती फाटे, शालेय व्यवस्थापन समिती यांचे सहकार्य लाभले.