Tuesday, June 28, 2022
Homeवर्धाजिल्ह्यातील 50 ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप- काँग्रेस समान

जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप- काँग्रेस समान

५० ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ः महाविकास आघाडी ८ तर राष्ट्रवादी ९ जागी
वर्धा ः जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीतील ४६० जागांसाठी २०६ मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सोमवारी १८ जानेवारीला मतमोजणी तालुका ठिकाणी तहसील कार्यालयात पार पडली. यात भाजपला १३, काँग्रेसला १३, राष्ट्रवादी ९, महाविकास आघाडीला ८ तर प्रहार, शेतकरी संघटना, सुनीता ढवळे गट, पावडे गट प्रत्येकी १ ग्रामपंचायत काबिज केली आणि विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.


सातही तालुक्यातील तहसील कार्यालयात तर सेलू येथे दीपचंद विद्यालयात सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत तब्बल १ हजार ३०१ उमेदवारांंनी निवडणूक रिंगणात उभे होते. यात समुद्रपूर तालुक्यात भाजप व आर्वी तालुक्यात काँग्रेस गटाने प्रत्येकी सहा ग्रामपंचायतीवर सत्ता काबिज केली. हिंगणघाट तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पाच ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली. तर महाविकास आघाडीने समुद्रपूर तालुक्यात चार ग्रामपंचायतीवर झेंडा फटकविला. तर प्रहार आणि शेतकरी संघटनेने या तालुक्यात ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविली.


या निवडणुकीत सत्ता मिळालेल्या विजयी उमेदवारांनी गुलवाल उधळून विजयी मिरवणूका काढीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

Prem Nagpure
Prem Nagpurehttp://vidarbhkalyan.com
Editor of Vidarbh Kalyan News media

Most Popular