सेलू :
कोरोना वर अंकुश लावण्यासाठी लसीकरण होणे गरजेचे आहे. तालुक्यातील विविध गावात सध्या लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे . जिल्हाधिकारी यांनी केळझर, आमगाव जंगली, दहेगाव गोसावी तसेच घोराड येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. लवकरात लवकर व जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे असे घोराड ग्रामपंचायतला सांगितले.

ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व आशा वर्कर यांना लस न घेणाऱ्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्या करीता प्रोत्साहित करावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
सदर बैठकीत उपविभागीय अधिकारी बगळे. ग्रामविकास अधिकारी पडघम, तहसीलदार महेंद्र सोनोने, पोलिस पाटील निलेश गुजरकर, सरपंच ज्योती घंगारे, आरोग्य विभागाचे वाडीभस्मे, मोनाली पिसे, कोमल ईखार, सारिका तिरडे, आरोग्य सेवक शंभरकर. आरोग्य सेविका बावणे, पोलिस कर्मचारी लेखा राठोड, सर्व आशा वर्कर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.